छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार, या शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शाळांच्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाकडून मागविण्यात आली होती. मात्र, ९२ शाळांनी ही माहिती विभागाला सादर केली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांच्या आदेशानुसार, शालेय मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये प्राथमिक शाळांच्या १७ मुख्याध्यापकांचा समावेश असून, १६ माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले की, उर्वरित विनाअनुदानित शाळांच्या माहितीच्या डेटामध्ये चूक झाल्याचे सांगितले आहे. तथापि, निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची माहिती न देणाऱ्या सर्व शाळांना खासगी शाळा असल्याचे लक्षात घेत, मुख्याध्यापकांच्या निलंबनाची कार्यवाही संबंधित संस्थाचालकांकडून केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सूचित केले की, संबंधित संस्थाचालकांनी निलंबनाच्या कारवाईची कार्यवाही केली नाही तर त्या शाळांचे अनुदान बंद करण्याची शिफारस शिक्षण सचिवांकडे केली जाईल.
- जुलै 2025 पासून लागू झालेले नवे पैसेसंबंधी नियम: पॅन-आधार, तात्काळ तिकिटे, UPI परतावा, GST नियम आणि बँक शुल्क
- सामंथा रूथ प्रभु आणि राज निदीमोरुच्या डेटिंग आणि लग्नाच्या अफवा: फोटो, सोशल मीडियावरील चर्चांमागचं सत्य
- Vi ने 23 नवीन शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली; यादी आणि फायदे जाणून घ्या
- Vi Guarantee योजना: ₹199 पासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना मिळणार 24 दिवसांची अतिरिक्त वैधता
- Lumio Arc 5 आणि Arc 7 प्रोजेक्टर देणार 100-इंच घरगुती सिनेमा अनुभव