छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार, या शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शाळांच्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाकडून मागविण्यात आली होती. मात्र, ९२ शाळांनी ही माहिती विभागाला सादर केली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांच्या आदेशानुसार, शालेय मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये प्राथमिक शाळांच्या १७ मुख्याध्यापकांचा समावेश असून, १६ माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले की, उर्वरित विनाअनुदानित शाळांच्या माहितीच्या डेटामध्ये चूक झाल्याचे सांगितले आहे. तथापि, निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची माहिती न देणाऱ्या सर्व शाळांना खासगी शाळा असल्याचे लक्षात घेत, मुख्याध्यापकांच्या निलंबनाची कार्यवाही संबंधित संस्थाचालकांकडून केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सूचित केले की, संबंधित संस्थाचालकांनी निलंबनाच्या कारवाईची कार्यवाही केली नाही तर त्या शाळांचे अनुदान बंद करण्याची शिफारस शिक्षण सचिवांकडे केली जाईल.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!