MahaTET परीक्षेबाबत महत्वाची बातमी; परीक्षेवेळी मिळणार आता ३ उत्तरपत्रिका; ‘एआय’ तंत्रज्ञानचा करण्यात येणार वापर

महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यंदा रविवारी, १० नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यातील ५९८ केंद्रांवर घेण्यात येणार असून परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी विविध तंत्रज्ञान आणि सुरक्षितता उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

यंदाच्या टीईटी परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना तीन उत्तरपत्रिका देण्यात येणार आहेत – एक मूळ उत्तरपत्रिका आणि दोन कार्बन कॉपी. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची एक कॉपी दिली जाणार आहे, तर दुसरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सुरक्षित ठेवली जाणार आहे. हे पाऊल घेतल्यामुळे निकालानंतर कोणताही गैरप्रकार टाळला जाईल, अशी अपेक्षा आहे.


महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षेदरम्यान गैरप्रकार किंवा सहाय्य करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवले जाईल. तसेच, विद्यार्थी केंद्रात प्रवेश करताना बायोमेट्रिक ठसे, चेहरा स्कॅनिंग आणि मेटल डिटेक्टर तपासणी केली जाईल. त्यामुळे बनावट विद्यार्थी अथवा अनधिकृत साहित्य आणणाऱ्या व्यक्तींना रोखले जाऊ शकेल.

टीईटी परीक्षेत पेपर-एकसाठी १,५२,५९७ विद्यार्थी तर पेपर-दोनसाठी २,०१,३३६ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १० नोव्हेंबरला राज्यभर ५९८ केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी यावेळी विद्यार्थ्यांना तीन उत्तरपत्रिका दिल्या जातील – एक मूळ आणि दोन कार्बन कॉपीज, ज्यामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक ठसे, चेहरा स्कॅनिंग, मेटल डिटेक्टर तपासणी, तसेच सीसीटीव्ही आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. यंदाच्या टीईटी परीक्षेत एकूण ३,५३,९३३ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

Leave a Comment