महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल लांबला
TAIT 2025 परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र बीएड व डीएडच्या अंतिम वर्षाच्या उमेदवारांनी अद्याप गुणपत्रक सादर न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं निकाल राखून ठेवला आहे.