अनुकंपाची १० हजार पदे भरण्याचा निर्णय; नियुक्तीचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – सप्टेंबरपासून नियुक्ती प्रक्रिया सुरू
राज्यात ९ हजारांहून अधिक अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा देत महाराष्ट्र शासनाने नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार असून, अनेक सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत.