ग्रामीण भागाचा निर्णायक पाठिंबा; पालकमंत्री सुरेश खाडे यांना ४५,१९५ मताधिक्य

पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी विधानसभा निवडणुकीत ४५,१९५ मताधिक्याने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या विजयात ग्रामीण भागाचा निर्णायक वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण मताधिक्यात मिरज शहराचा वाटा केवळ ९०५ मतांचा असून उर्वरित ४४,२९० मते ग्रामीण भागातील ४८ गावांनी दिली आहेत. ग्रामीण भागातील गावांनी खाडे यांना मोठा पाठिंबा दिला. शिंदेवाडी हे एकमेव गाव अपवाद ठरले, … Read more

महिला आरोग्य सेविकांच्या ५९७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात

कोरोनाच्या काळात आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली महत्त्वाची भूमिका निभावली. राज्य सरकारने आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार ५ ऑगस्ट २०२३ रोजी महिला आरोग्य सेविकांच्या ५९७ रिक्त जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, आरोग्य विभागाने १९ जुलै २०२४ रोजी उमेदवारांची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या आधारावर, सर्वसाधारण प्रवर्गातील १७० … Read more

महाराष्ट्रात विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर होत आहे दंड, ई-चलन मशिनमध्ये करण्यात आली सुधारणा

महाराष्ट्र सरकारने विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक यांनी दिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश जारी करण्यात आला असून, आता दुचाकी चालकांसोबतच पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवरही कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट सक्तीबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी, विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर … Read more

पर्यावरण आणि विकास यांचा समन्वय आवश्यक – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

देशाच्या प्रगतीसाठी विकास आणि पर्यावरण रक्षणाचा समतोल राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली दुराग्रही भूमिका घेणे टाळण्याचा सल्ला दिला. ‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज, कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी, नॅशनल स्टॉक … Read more

आता RTO ऑफिसच्या फेऱ्या बंद; हलक्या मालवाहू वाहनांच्या नोंदणीसाठी फेसलेस सेवा सुरू

राज्यातील वाहन नोंदणी प्रक्रिया आणखी सोपी करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. २८ नोव्हेंबरपासून हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) पद्धतीने ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी आणि सर्व संबंधित वाहन वितरकांकडे लागू असणार आहे. या सुविधेमुळे हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी पूर्णपणे फेसलेस पद्धतीने … Read more

फॅन्सी गाडी क्रमांक मिळवण्यासाठी आता परिवहन कार्यालयांमध्ये जायची नाही गरज – ऑनलाईन पोर्टल सुरू fancy.parivahan.gov.in/

महाराष्ट्रातील वाहन धारकांसाठी वाहन नोंदणी क्रमांक आरक्षण प्रक्रियेला आता ऑनलाईन स्वरूप देण्यात आले आहे. आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी नागरिकांना परिवहन कार्यालयाला भेट देण्याची गरज राहिलेली नाही. परिवहन विभागाने ही प्रक्रिया फेसलेस पद्धतीने राबवण्यासाठी https://fancy.parivahan.gov.in/ हे संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे फायदे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या माहितीनुसार, या फेसलेस सेवेचा … Read more

नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नियोजनाची प्रशंसा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि अन्य केलेल्या कार्यांची मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी प्रशंसा केली आहे. आज झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत श्री. चोक्कलिंगम यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा … Read more

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांशी भेट; मंत्रिमंडळाचा राजीनामा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आज (२६ नोव्हेंबर) राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. राज्यपालांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नवीन व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रसंगी … Read more

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीत यवतमाळच्या खरेदीदाराला एक कोटी रुपयांचे पहिले बक्षीस

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयात जाहीर करण्यात आला. या सोडतीत यवतमाळ येथील न्यू जय अंबे लॉटरी भंडारामधील खरेदीदाराला एक कोटी रुपयांचे पहिले (सामायिक) बक्षीस लागले असल्याची माहिती उपसंचालकांनी दिली आहे. सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ. श्री. एन. … Read more

गावातील मुलांना नोकरी का देत नाही? टोल नाक्यावर तुफान राडा, १२ जणांवर गुन्हा दाखल

धुळे-सोलापूर महामार्गावरील बोरविहीर फाट्याजवळील टोल नाक्यावर गावातील तरुणांनी तुफान गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी १२ जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंधळाचा कारण आणि घटनागावातील मुलांना नोकरी का देत नाही, असा सवाल करत १० ते १२ जणांच्या … Read more