देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून शपथ, पहिल्याच दिवशी रुग्णसेवेसाठी मोठा निर्णय

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मंत्रालयात प्रवेश करताच त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करून रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. पहिल्या निर्णयात रुग्णाला पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. … Read more

ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात गुन्हा दाखल

ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात निवडणूक आयोगाने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जाणून घ्या या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण.

ग्रामीण भागाचा निर्णायक पाठिंबा; पालकमंत्री सुरेश खाडे यांना ४५,१९५ मताधिक्य

पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी विधानसभा निवडणुकीत ४५,१९५ मताधिक्याने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या विजयात ग्रामीण भागाचा निर्णायक वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण मताधिक्यात मिरज शहराचा वाटा केवळ ९०५ मतांचा असून उर्वरित ४४,२९० मते ग्रामीण भागातील ४८ गावांनी दिली आहेत. ग्रामीण भागातील गावांनी खाडे यांना मोठा पाठिंबा दिला. शिंदेवाडी हे एकमेव गाव अपवाद ठरले, … Read more

नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नियोजनाची प्रशंसा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि अन्य केलेल्या कार्यांची मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी प्रशंसा केली आहे. आज झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत श्री. चोक्कलिंगम यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा … Read more

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांशी भेट; मंत्रिमंडळाचा राजीनामा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आज (२६ नोव्हेंबर) राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. राज्यपालांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नवीन व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रसंगी … Read more

निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून इतक्या मतांची असते गरज, जाणून घ्या सर्व माहिती

निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांचा पराभव डिपॉझिट जप्त होण्यातून अधोरेखित होतो. यंदा राज्यातील निवडणुकीत किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल. डिपॉझिट जप्त होणे म्हणजे उमेदवारासाठी मोठा धक्का, कारण वैध मतांच्या एकषष्ठांशपेक्षाही कमी मते मिळाल्यास ही रक्कम जप्त होते. लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अनेकजण अपक्ष … Read more

वर्ध्यात मतदानादरम्यान गोंधळ: शरद पवार गटाचे नितेश कराळे मास्तर यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

वर्धा जिल्ह्यातील उमरी इथे विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे मास्तर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली, ज्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. घटनेचा व्हिडीओ व्हायरल या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भाजप कार्यकर्त्यांनी नितेश कराळे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या गोंधळामुळे उमरीचे वातावरण चांगलेच तापले … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेला विलंब

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत असून मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत. मात्र, सुरुवातीच्या काही तासांतच अनेक ठिकाणी ईव्हीएम आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील अडचणी छत्रपती संभाजीनगरमधील चार मतदान केंद्रांवर तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर … Read more

निवडणूक विभागाला माहिती न देणाऱ्या ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार, या शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शाळांच्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाकडून मागविण्यात आली होती. मात्र, ९२ शाळांनी ही माहिती विभागाला सादर केली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांच्या … Read more