पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी विधानसभा निवडणुकीत ४५,१९५ मताधिक्याने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या विजयात ग्रामीण भागाचा निर्णायक वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण मताधिक्यात मिरज शहराचा वाटा केवळ ९०५ मतांचा असून उर्वरित ४४,२९० मते ग्रामीण भागातील ४८ गावांनी दिली आहेत.
ग्रामीण भागातील गावांनी खाडे यांना मोठा पाठिंबा दिला. शिंदेवाडी हे एकमेव गाव अपवाद ठरले, जिथे त्यांना ११ मते कमी मिळाली. इतर सर्व गावांतून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले. मालगाव, आरग, बेडग, म्हैसाळ, सलगरे यांसारख्या गावांनी विशेषतः मोठे मताधिक्य दिले आहे. लहान गावेही यात मागे राहिली नाहीत. निलजी, बामणी, शिपूर, कांचनपूर, रसूलवाडी, पाटगाव, सांबरवाडी, काकडवाडी या गावांतील मताधिक्य लक्षणीय ठरले.
हेही वाचा –
शहरासह ग्रामीण भागातील विकासकामांसाठी सुरेश खाडे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला. बालगंधर्व नाट्यगृहाचे सुशोभीकरण, अद्यावत भाजी मंडई, शिवाजी क्रीडांगणाची दुरुस्ती, तालुका क्रीडा संकुल, वारकरी भवन, रस्त्यांचे डांबरीकरण अशी कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. ग्रामीण भागात निधी वाटप आणि प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी मतदारांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मिरज शहरातून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याचे सत्य आहे, मात्र ग्रामीण भागातील विश्वास आणि पाठिंब्याच्या जोरावर पालकमंत्र्यांनी मोठा विजय मिळवला आहे.
- Casio G-Shock: स्टाईल आणि टिकाव यांचा जबरदस्त संगम
- HSRP नंबर प्लेट कसे बनवाल तेही आपल्या मोबाईलवरून
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 2024 पिक विमा भरपाईसाठी 1028 कोटींचा निधी वितरीत
- IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ फेल? पहिल्या दिवशी टीम इंडिया मानसिक लढाईत सरस!
- लॉर्ड्स कसोटी : नितीश कुमार रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, पहिल्याच षटकात दोन विकेट्स