महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ संदर्भातील महत्त्वाचे प्रसिध्दीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, TAIT परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार परीक्षेला उपस्थित झाले. यामध्ये बी.एड. व डी.एल.एड. या व्यावसायिक पात्रतेनुसार उमेदवारांनी ‘Appear’ म्हणून ऑनलाईन अर्ज सादर केले होते.
- बी.एड. परीक्षेचे १५,७५६ उमेदवार
- डी.एल.एड. परीक्षेचे १,३४२ उमेदवार
- एकूण १७,०९८ उमेदवारांनी Appear म्हणून नोंदणी केली होती.
यापैकी परिषदेच्या नोंदीप्रमाणे बी.एड. चे ९९५२ व डी.एल.एड. चे ८२७, अशा एकूण १०,७७९ उमेदवारांची माहिती प्राप्त झाली असून त्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
मात्र, ज्या उमेदवारांनी आपल्या व्यावसायिक पात्रतेचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र परिषदेपुढे सादर केलेले नाही, त्यांचा निकाल सध्या राखीव ठेवण्यात येणार आहे. अशा उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
- बी.एड. उमेदवार – ५८०४
- डी.एल.एड. उमेदवार – ५१५
- एकूण – ६३१९
या विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकवर (https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx) आवश्यक कागदपत्रे निश्चित कालावधीत अपलोड केली नसल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.
👉 त्यामुळे सर्व उमेदवारांनी आपल्या निकालाबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी पाहावी.