कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीस मुदतवाढ; नवा रिपोर्टिंग कालावधी जाहीर
महाराष्ट्रातील कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या प्रवेश फेरीस मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आता रिपोर्टिंगसाठी विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टपर्यंतची अतिरिक्त संधी मिळणार आहे.