मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!

मुंबई क्रिकेटमधील युवा प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शॉ सध्या चर्चेत आहे. त्याच्या फिटनेस समस्यांमुळे आणि शिस्तीच्या अभावामुळे त्याला रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीच्या संघातून वगळण्यात आले आहे. एकेकाळी दुसरा सचिन तेंडुलकर म्हणून गौरवलेल्या पृथ्वी शॉची कारकीर्द आता संकटात आहे.

मुंबई संघातून वगळण्याची कारणे


मुंबई क्रिकेट संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉच्या जीवनशैलीत सातत्याचा अभाव दिसत आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दरम्यान त्याने नियमित प्रशिक्षण सत्रांना उपस्थिती लावली नाही. त्याच्या पार्टी करण्याच्या सवयी आणि फिटनेस समस्यांमुळे संघावर दडपण येत होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याला क्षेत्ररक्षणात लपवावे लागत होते. चेंडू त्याच्या दिशेने गेला तरी तो चेंडूपर्यंत पोहोचत नव्हता.”

श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया


मुंबईच्या कर्णधार श्रेयस अय्यरनेही पृथ्वीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. अय्यर म्हणाला, “आम्ही कोणालाही सांभाळून मोठं करू शकत नाही. प्रत्येकाने स्वतःला सुधारावे लागेल. त्याला आपली जबाबदारी ओळखायला हवी.”

पृथ्वी शॉची सोशल मीडियावर प्रतिक्रिया


मुंबई संघातून वगळल्यानंतर पृथ्वीने आपल्या कामगिरीचा अहवाल इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याने लिहिले, “65 डावांमध्ये 3399 धावा, 55.7 चा सरासरी, 126 चा स्ट्राईक रेटही पुरेसा नाही का?” मात्र, त्याच्या या प्रतिक्रियेनंतरही त्याच्या चुका सुधारण्याचा कोणताही प्रयत्न झालेला दिसत नाही.

पुढे काय?


मुंबई क्रिकेट आणि पृथ्वी शॉ यांच्यातील तणाव उघड झाला आहे. राष्ट्रीय संघाच्या बाहेर गेलेल्या पृथ्वी शॉसाठी IPL आणि परदेशी फ्रँचायझी क्रिकेट हा एकमेव पर्याय ठरू शकतो. काही जणांना वाटते की, तो अमेरिकेत जाऊन क्रिकेट खेळण्याचा पर्याय निवडू शकतो.

एकेकाळी भारतीय क्रिकेटच्या मोठ्या आशेचा किरण असलेल्या पृथ्वी शॉने स्वतःला सुधारण्याची गरज आहे. शिस्त आणि फिटनेसकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्या क्रिकेट कारकीर्दीवर कायमचा विराम लागू शकतो.

Leave a Comment