पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024 चा निकाल 14 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार, पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद तसेच शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/८/प) कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत.
ही प्रमाणपत्रे 01 सप्टेंबर 2025 ते 08 सप्टेंबर 2025 या कालावधीत पात्र उमेदवारांना वितरित केली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला www.mscepune.in भेट देऊन दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
👉 उमेदवारांनी ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली आहे त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालय किंवा शिक्षण निरीक्षक, मुंबई (उ/८/प) यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. यासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
यामुळे MAHATET 2024 मधील पात्र उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता प्रमाणपत्र प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध होणार आहे.