10th, 12th Exam Schedule Announced: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 सालातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, बारावीच्या लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहेत, तर दहावीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत.
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, आणि तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान होतील, तर दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, आणि तोंडी परीक्षा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पार पडतील.
राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय शिक्षण मंडळांअंतर्गत ही परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन सोयीस्कर व्हावे म्हणून संभाव्य वेळापत्रक याआधी ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आले होते. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
आधी परीक्षा, वेगवान निकाल प्रक्रियेचा मानस
2025 सालच्या परीक्षांचे वेळापत्रक नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधीचे ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी वेळेवर प्रवेश प्रक्रिया होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा वेळेत पार पडणे आणि पुरवणी परीक्षांचा निकाल लवकर लागणे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. जुलै महिन्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या वेळापत्रकानुसार तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
- डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर उच्च न्यायालयाचा निर्णय: रुग्णांना स्पष्ट औषध नोंदी मिळण्याचा अधिकार
- मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन: प्रगतीचा वेग, तंत्रज्ञानाचा ठसा आणि भविष्यातील आरंभीचे स्पंदन
- इतिहासाच्या पायथ्याशी प्रतिमा, हस्तकला आणि आठवणी – ASI च्या स्मृतीगृहात ‘मेड‑इन‑इंडिया’ स्मृतिचिन्हांची नवी सुरुवात
- “सहमतीचे नाते—बलात्कार नाही: सूरत सत्र न्यायालयाचा महत्वाचा निर्णय”
- Q1 FY26 मध्ये भारताचे GDP 7.8% ने वाढले – शेती, बांधकाम क्षेत्राचा महत्वपूर्ण वाटा