केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे पेन्शनधारक अजूनही वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे राहून गेले आहेत, त्यांच्यासाठी त्वरित कृती करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबर महिन्यापासून पेन्शन थांबवली जाऊ शकते.
महत्त्वाची तारीख:
८० वर्षांवरील पेन्शनधारकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते, तर इतर पेन्शनधारकांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे प्रमाणपत्र सादर करायचं होतं. आता फक्त ८ दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे जे प्रमाणपत्र सादर करायचं राहून गेले आहे, त्यांनी त्वरित हे काम पूर्ण करावं.
प्रमाणपत्र सादर करण्याचे पर्याय:
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. यासाठी ओळखपत्राची आवश्यकता असेल. तसेच, तुम्ही पोस्टाद्वारे, उमंग अॅप किंवा पीडीएद्वारेदेखील प्रमाणपत्र सादर करू शकता.
प्रमाणपत्र सादर न केल्यास काय होईल?
जर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास, डिसेंबर महिन्यापासून तुमचं पेन्शन थांबवण्याची शक्यता आहे. UIDAI नुसार, जीवन प्रमाणपत्र एकदा सादर केल्यावर पेन्शन थकबाकी रक्कमेसह दिली जाईल, पण तीन किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जमा केले जाणार नाही.
तुम्ही लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र सादर करा, जेणेकरून तुमचं पेन्शन वेळेवर मिळेल आणि तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!