महाराष्ट्रातील नोंदणी मुद्रांक विभाग गट ड भरती 2025 परीक्षेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 284 पदांसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा 1 जुलै ते 8 जुलै 2025 या कालावधीत पार पडली. परीक्षेनंतर उमेदवार निकाल, गुणांकन यादी, निवड यादी आणि प्रतीक्षा यादीच्या प्रतिक्षेत आहेत.
IGR महाराष्ट्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा निकाल 26 ऑगस्ट 2025 च्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या संख्येने उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे. निकाल जाहीर होताच उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून (महाभरती डॉट इन) लिंकद्वारे गुण व निकाल तपासता येईल.
तसेच, विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सी किंवा मध्यस्थामार्फत नियुक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा मध्यस्थाच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणी अशा प्रकारची माहिती देत असेल तर त्यापासून सावध राहावे.
महत्वाचे मुद्दे:
- भरती पदसंख्या: 284
- परीक्षेचा कालावधी: 1 जुलै ते 8 जुलै 2025
- अपेक्षित निकाल तारीख: 26 ऑगस्ट 2025
- निकाल पाहण्याची अधिकृत वेबसाईट: महाभरती डॉट इन
- सूचना: कोणत्याही मध्यस्थाशी संपर्क टाळावा
उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असून निकालाच्या तारखेसाठी अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.