जाहीर ई-लिलावात जप्त केलेली वाहने विक्रीसाठी; येथे विकत घेऊ शकाल हवी ती गाडी

पिंपरी-चिंचवडमध्ये 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर ई-लिलाव आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये टार वाहन कर न भरलेल्या आणि मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमुळे जप्त केलेली 10 वाहने विक्रीसाठी उपलब्ध असतील. या लिलावासाठी ई-लिलावाच्या नोंदणीसाठी 16 ते 19 डिसेंबर 2024 दरम्यान www.eauction.gov.in या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.



लिलावाच्या अटी आणि नियम 9 डिसेंबर 2024 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच, इच्छुक व्यक्तींना वाहनांची पाहणी 9 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड येथे करता येईल.



लिलावात सहभागी होणाऱ्यांना वाहनांची विक्री ‘जशी आहे तशी’ या तत्वावर केली जाईल. वाहनांची यादी संबंधित वेबसाइट आणि विविध सरकारी कार्यालयांमध्ये देखील जाहीर केली जाईल. ई-लिलाव प्रक्रियेत कोणतेही कारण न देता रद्द किंवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कराधान प्राधिकारी यांच्या कडे राखीव ठेवले आहेत.



सर्व वाहन मालक, चालक आणि वित्तदात्यांना लिलावात भाग घेण्यासाठी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment