सांगली, 5 डिसेंबर 2024: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या दि. 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार, 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड व बीएड पात्रता धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 निश्चित करण्यात आली होती.
मात्र, आज दि. 5 डिसेंबर 2024 रोजी शिक्षण संचालनालय, पुणे येथील शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आलेल्या सूचनेनुसार, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. शासन स्तरावरून पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतरच या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषद, सांगलीच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कळविले आहे.
उमेदवारांनी नोंद घ्यावी:
10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील कंत्राटी शिक्षक भरतीबाबत सर्व उमेदवारांनी पुढील सूचना व शासन निर्णयाची वाट पाहावी.
संपर्क माहिती:
ईमेल: eoprisang@gmail.com
दूरध्वनी क्रमांक: 0233-2372717
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांचे आवाहन:
उमेदवारांनी भ्रमित होऊ नये आणि पुढील आदेशासाठी सतत संपर्कात राहावे.
- Hero Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च: सर्वात स्वस्त किंमतीत स्मार्ट फीचर्स आणि हटके बॅटरी प्लान
- Motorola ने भारतात लॉन्च केला दमदार Moto G96 5G स्मार्टफोन; किंमत ₹17,999 पासून
- SIP च्या माध्यमातून १० वर्षांत बना कोटीपती! जाणून घ्या संपूर्ण योजना
- कर्नाटकमधील गुहेत दोन मुलींंसह राहणारी रशियन महिला सापडली, व्हिसा २०१७ पासून कालबाह्य
- जसप्रीत बुमराहचा लॉर्ड्सवर ‘पंजा’; कपिल देव यांचा विक्रम मोडत दिलं शांत सेलिब्रेशनचं कारण