बार्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी CET अर्ज भरण्याची मुदतवाढ, आता या तारखेपर्यंत संधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी CET अर्ज भरण्याची मुदत आता २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच २९-३० ऑगस्टला अर्ज दुरुस्तीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.