महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये लवकरच निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात
महाराष्ट्रातील 460 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.