महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०२५ साली होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) आणि पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची संधी ७ डिसेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध आहे.
शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी यापूर्वी १७ ऑक्टोबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, काही शाळांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला गेला आहे.
अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी:
1. नियमित शुल्कासह अर्ज: १७ ऑक्टोबर २०२४ ते ७ डिसेंबर २०२४
2. विलंब शुल्कासह अर्ज: ८ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४
3. अतिविलंब शुल्कासह अर्ज: १६ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४
4. अतिविशेष विलंब शुल्कासह अर्ज: २४ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४
३१ डिसेंबर २०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची शाळांनी आणि पालकांनी नोंद घ्यावी.
परीक्षा तारीख:
हेही वाचा –
९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहेत.
अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाची माहिती:
अर्ज भरण्याची प्रक्रिया mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावरून पूर्ण करता येईल.
अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्यास ई-मेल mscescholarship@gmail.com किंवा दूरध्वनी क्रमांक 020-29709617 वर संपर्क साधावा.
शाळांनी त्वरित पावले उचलावीत
ज्या शाळांनी अद्याप अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी देण्यात आलेल्या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होण्याची संधी द्यावी.
(अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार)
- पेशींतील पॉवरहाऊस माइटोकॉन्ड्रिया देतात जीवाणूंवर मात – नवे संशोधन
- आयुष शेट्टीची चमकदार कामगिरी! मकाऊ ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली
- 🌧🌧🌧कोयना धरणातून १२,६७१ क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 🌧🌧🌧🌧
- गणेशोत्सवासाठी मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा लवकरच सुरू; प्रवाशांसाठी जलद, आरामदायी पर्याय
- 🍴🍱जेवणापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक का? तज्ज्ञ काय सांगतात?