कोरोनाच्या काळात आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली महत्त्वाची भूमिका निभावली. राज्य सरकारने आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार ५ ऑगस्ट २०२३ रोजी महिला आरोग्य सेविकांच्या ५९७ रिक्त जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, आरोग्य विभागाने १९ जुलै २०२४ रोजी उमेदवारांची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या आधारावर, सर्वसाधारण प्रवर्गातील १७० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ४३ उमेदवार प्रतीक्षेत ठेवले गेले आहेत.
हेही वाचा:
भरती प्रक्रिया निवडणुकांच्या तोंडावर होऊन आचारसंहितेच्या अडसरामुळे नियुक्तिपत्र देण्यात अडचणी निर्माण झाल्या. तथापि, ‘पेसा’ योजनेअंतर्गत ३५ पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देऊन, त्यांनी आचारसंहितेच्या काळात आरोग्यसेविका म्हणून आपली जबाबदारी सांभाळली. आता आचारसंहिता संपल्यानंतर, उमेदवारांनी पुन्हा भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आग्रह केला आहे.
भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यात आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीनंतर, या फाइलला जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर केले जाईल.
आरोग्य विभागाने या भरती प्रक्रियेत फक्त ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी (एएनएम) पदविका प्रमाणपत्राची अट ठेवली आहे. काही महिलांनी जीएनएम किंवा बी.एससी (नर्सिंग) प्रमाणपत्रावर अर्ज केला होता. कागदपत्रांची पडताळणी करताना ज्या उमेदवारांकडे एएनएम प्रमाणपत्र नव्हते, त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम यादीत अजून काही उमेदवारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे.
- Dashavatar Box Office: ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘वेड’चा रेकॉर्ड मोडणार का दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट?
- चंदन आणि बेसनचा फेस मास्क: टॅनिंग घालवून चेहऱ्याला देईल नैसर्गिक ग्लो
- ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा
- पुरण न वाटता बनवा टम्म, गुबगुबीत आणि मऊसर पुरणपोळी – नवशिक्यांसाठी सोप्या टिप्स
- चहाला साखरेऐवजी घाला हे 5 नैसर्गिक पदार्थ, चहा बनेल हेल्दी व नैसर्गिक गोड