सावधान: तर आपले रेशन कार्ड करण्यात येईल रद्द?
सरकारकडून सध्या रेशन कार्डधारकांची तपासणी सुरू आहे. अपात्र ठरलेल्या व्यक्तींवर दंड आणि तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते. अपात्रतेचे निकष म्हणजे, वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात २ लाख आणि शहरी भागात ३ लाखांपेक्षा जास्त असणे, सरकारी नोकरीत असणे, १०० स्क्वेअर यार्डपेक्षा जास्त जमीन असणे किंवा परवाना असलेले शस्त्र बाळगणे. या निकषांमध्ये बसणाऱ्यांनी कायदेशीर समस्या टाळण्यासाठी आपले रेशन कार्ड स्वेच्छेने परत करणे उचित आहे. सरकार गरजूंसाठी असलेल्या या योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी हे कठोर पावले उचलत आहे.