मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही अफवा! महिला व बाल विकास विभागाने दिले स्पष्टीकरण
सध्या सोशल मीडियावर ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने एक फसवा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भात महिला व बाल विकास विभागाने अधिकृत स्पष्टीकरण देत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.