अकरावी प्रवेश प्रक्रिया: दुसऱ्या यादीत ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संधी, वाणिज्य शाखेची बाजी
मुंबई विभागातील अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ७९,४०३ विद्यार्थ्यांना संधी मिळाली असून वाणिज्य शाखेने सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. प्रवेशासाठी १८ ते २१ जुलैदरम्यान महाविद्यालयात हजर राहणे बंधनकारक.