मुंबई उच्च न्यायालयातील भरतीत बनावट प्रमाणपत्रांचा पर्दाफाश; पाच उमेदवारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई उच्च न्यायालयातील भरती प्रक्रियेत पाच उमेदवारांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी फसवणुकीसह गुन्हा दाखल केला असून, भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत चिंतेचे वातावरण आहे.