वाढत्या वायुप्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढला; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा
पुण्यातील वाढत्या वायुप्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगासह गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पीएम २.५ सारखे सूक्ष्म कण फुप्फुसांना गंभीर हानी पोहोचवतात.