जपानी Toyoake शहराने दिला मोबाईल वापराचा नवा अलर्ट: ‘दररोज फक्त दोन तास मोबाइल वापरा’
जपानमधील Toyoake शहराने दररोज फक्त दोन तास स्मार्टफोन वापरण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेसमोर मांडला आहे. झोप, मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी हा उपक्रम असून, तो बंधनकारक नसून नागरिकांना जागरुक करण्यावर भर देतो. या प्रस्तावावर सुमारे ८०% लोकांचा विरोध दिसून आला आहे.