जिल्ह्यातील १९० धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न सुटणार; पालकमंत्री बावणकुळे यांची तातडीची कारवाई
नागपूर जिल्हा परिषदेच्या १९० धोकादायक वर्गखोल्या नव्याने बांधण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी पुढाकार घेतला असून जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच विद्यार्थ्यांना सुरक्षित व नव्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेता येणार आहे.