Sneha Chavan : अनिकेत विश्वासरावची एक्स बायकोने केले पुन्हा लग्न, लग्नाला होते फक्त हेच लोक उपस्थित

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री स्नेहा चव्हाण ही तिच्या अभिनय कौशल्यासह वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळेही चर्चेत राहिली आहे. २०१८ मध्ये तिने अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या दोनच वर्षांमध्ये त्यांचे नाते तुटले आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या वेळी स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे तिच वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय बनला होता.

घटस्फोटानंतर स्नेहा काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. आता मात्र ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी तिच्या आयुष्यातील एका आनंदी प्रसंगामुळे. स्नेहाने पुन्हा एकदा लग्न केले आहे, आणि तिचे हे साधे पण पारंपरिक लग्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्नेहाच्या साध्या पण आनंदी लग्नाचा सोहळा

स्नेहाचं हे दुसरं लग्न तिच्या घरच्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने पार पडले. स्नेहाने तिच्या लग्नासाठी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती, जी तिला अत्यंत सुंदर दिसत होती. तिचा नवरा मानसनेही जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, ज्यामुळे दोघेही एकसारख्या पारंपरिक रंगात मस्त दिसत होते. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



रिसेप्शनसाठी मॉडर्न लूक

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी स्नेहाने रिसेप्शनची पार्टी ठेवली होती, ज्यात तिच्या मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांनी हजेरी लावली. रिसेप्शनसाठी स्नेहाने एक डिझायनर गाऊन घातला होता, ज्यात तिचा लूक खूपच मोहक दिसत होता. मानसने यावेळी ब्लॅक थ्रीपीस सूट परिधान केला होता. त्यांच्या या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.



स्नेहाच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रवास आणि अनिकेतसोबतचा वाद

स्नेहाचा अनिकेतसोबतचा संसार फक्त दोन वर्षेच टिकला. घटस्फोटाच्या वेळी स्नेहाने अनिकेतवर गंभीर आरोप केले होते. तिने घरगुती हिंसाचार, शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले होते, तसेच जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला असल्याचे तिचे म्हणणे होते. अनिकेतने मात्र हे सर्व आरोप पोटगी मिळवण्यासाठी केल्याचा प्रत्यारोप केला होता. या वादामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती.

आता स्नेहा पुन्हा एकदा आनंदी आयुष्य जगण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या नव्या आयुष्याला सुखाची आणि शांतीची सुरुवात मिळावी, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.

Leave a Comment