सेट 2025 परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका 26 जून रोजी जाहीर होणार: विद्यार्थ्यांना 2 जुलैपर्यंत हरकती सादर करण्याची संधी

पुणे, २५ जून २०२५: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या ४० व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET 2025) ची प्राथमिक उत्तरतालिका (Interim Answer Key) २६ जून २०२५ रोजी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ही परीक्षा १५ जून २०२५ रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण १८ शहरांतील २५६ परीक्षा केंद्रांवर पार पडली होती.

हरकती कशा करायच्या?


विद्यार्थ्यांना उत्तरतालिकेबाबत काही हरकती/सूचना असल्यास त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्या लागतील.
प्रत्येक प्रश्नासाठी ₹200/- शुल्क (Non-refundable) भरावे लागेल.
हरकतीसाठी योग्य पुरावे जोडणे आवश्यक आहे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख: २ जुलै २०२५, संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
ऑनलाईन

Leave a Comment