भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मुंबईत एक भावनिक भेट झाली. एकेकाळी खांद्याला खांदा लावून क्रिकेटच्या मैदानावर धमाल घालणारे हे दोन जिगरी मित्र, आज त्यांच्या कारकीर्दीच्या उतार चढावांनंतर पुन्हा एकत्र आले. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भेटीचे मुख्य कारण होते, त्यांच्या मार्गदर्शक आणि क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचा अनावरण समारंभ. या कार्यक्रमात सचिन आणि विनोद यांची भावनिक भेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सचिन तेंडुलकर कार्यक्रमाच्या स्टेजवर विनोद कांबळीला पाहून त्याला भेटायला गेला, आणि त्या क्षणी दोघांच्या मैत्रीचं जणू एक नवा अध्याय लिहिला गेला. विनोद कांबळी सचिनचा हात कडक धरून त्याला मिठी मारताना दिसला, जो क्षण उपस्थितांना संस्मरणीय ठरला.
विश्वविक्रमी भागीदारी आणि त्यानंतरचे जीवन
सचिन आणि कांबळी यांचा शालेय क्रिकेटच्या काळात झालेल्या ६६४ धावांच्या विश्वविक्रमी भागीदारीने क्रिकेटच्या इतिहासात एक अविस्मरणीय ठसा दिला. सचिन तेंडुलकर आपल्या करिअरमध्ये अनेक विक्रम नोंदवून क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर बनला, तर कांबळीच्या कारकीर्दीला वेगळं वळण मिळालं. कांबळी, ज्याने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला दोन सलग द्विशतकं झळकवली, त्यानंतर विविध वादग्रस्त घटनांमुळे क्रिकेटपासून दूर पडला. तरीही, सचिन आणि कांबळीच्या मैत्रीचे नाते कायम राहिले.
विनोद कांबळींच्या आयुष्यातील संघर्ष
हेही वाचा –
कांबळीला मैदानाबाहेर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याच्या आर्थिक, मानसिक आणि आरोग्यविषयक संघर्षामुळे तो बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून आहे. २०२२ मध्ये कांबळीने स्वतःच सांगितले की, तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून करत आहे. काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात तो चालताना धडपडत असल्याचं दिसत होतं. मात्र त्या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी होऊ शकली नाही.
आचरेकरांच्या स्मारकाचे अनावरण
या कार्यक्रमात सचिन आणि विनोद व्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू पारस महांब्रे, प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू, समीर दिघे आणि संजय बांगर यांसारखे इतर क्रिकेटपटू देखील उपस्थित होते. क्रिकेटमधील या दिग्गजांच्या एकत्र येण्याने कार्यक्रमाला वेगळाच रंग दिला.
सचिन आणि कांबळी यांची ही भेट त्याच्या शिष्य गुरू रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणाच्या निमित्ताने घडली, आणि त्या वेळी होणारी भावनिकता दर्शवते की, क्रिकेटच्या मैदानावर असलेली मैत्री त्यापेक्षा अधिक मोठी असू शकते.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!