रमैया वस्तावैया मधल्या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अपयशानंतर उभा केला 47 हजार कोटींचा व्यवसाय

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा विषय नेहमीच चर्चेत असतो. स्टार किड्सना एंट्री मिळणे सोपे वाटत असले तरी त्यांना यशाची हमी नसते. असेच काहीसे झाले बॉलिवूड अभिनेता गिरीश तौरानी याच्या बाबतीत. वडिलांच्या पाठिंब्यावर बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री घेतल्यानंतरही गिरीशला फार काळ इंडस्ट्रीत टिकता आले नाही. मात्र, अपयशाच्या अनुभवातून शिकत त्याने व्यावसायिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आणि आज तो 47,000 कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे.

‘रमैया वस्तावैया’मधून बॉलिवूड पदार्पण


गिरीश तौरानीने 2013 मध्ये प्रभू देवा दिग्दर्शित ‘रमैया वस्तावैया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटाची निर्मिती त्याचे वडील कुमार तौरानी यांनी केली होती. 38 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने साधारण 38.34 कोटींची कमाई केली होती. गिरीशने या चित्रपटात अभिनेत्री श्रुती हसनसोबत मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, त्यानंतर त्याला फारसे प्रोजेक्ट्स मिळाले नाहीत.

बॉलिवूडमधील संघर्ष आणि अपयश


‘रमैया वस्तावैया’ नंतर गिरीश तीन वर्षे रिकामा बसला. 2016 मध्ये त्याला ‘लव्हशुदा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. गिरीशने एका शॉर्टफिल्ममध्येही काम केले, पण त्याला अपेक्षित ओळख मिळाली नाही. शेवटी, गिरीशने आपले फिल्मी करिअर संपवण्याचा निर्णय घेतला.

व्यवसायात उभारले यशस्वी करिअर

हेही वाचा –



बॉलिवूडमध्ये अपयश पदरी पडल्यावर गिरीशने टिप्स इंडस्ट्रीजमध्ये वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. काका रमेश तौरानी यांच्या मदतीने गिरीशने टिप्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय विस्तारत नेला. आज गिरीश तौरानी टिप्स इंडस्ट्रीजचा सीओओ आहे आणि एका अहवालानुसार, त्याच्या कंपनीचा व्यवसाय 47,000 कोटींपर्यंत पोहोचला आहे.

घराणेशाही यशाची हमी नाही


गिरीश तौरानी याचे उदाहरण पुन्हा एकदा सिद्ध करते की बॉलिवूडमध्ये घराणेशाही ही यश मिळवण्याची खात्रीशीर हमी नाही. प्रेक्षक फक्त त्या कलाकारांनाच स्वीकारतात, जे स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करतात.

बॉलिवूडमधील अपयशाकडे केवळ अडथळा न मानता, गिरीशने व्यावसायिक क्षेत्रात यशाची नवीन ओळख निर्माण केली. त्याची ही प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.

Leave a Comment