रिषभ पंतने जीव वाचवणाऱ्या दोन व्यक्तींना दिली खास भेट; ऑस्ट्रेलियात कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने आपल्या अपघाताच्या घटनेत जीव वाचवणाऱ्या दोन व्यक्तींना अनोखी भेट दिली आहे. पंतने त्यांना स्कूटर भेट दिल्या असून, यामुळे त्याच्या या कृतीची ऑस्ट्रेलियातही चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने देखील पंतच्या या उदारवृत्तीचे कौतुक केले आहे.

2022 मध्ये दिल्लीहून घरी जात असताना रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात कारला आग लागली होती, मात्र दोन व्यक्तींनी वेळीच हस्तक्षेप करून पंतला बाहेर काढले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले. या घटनेनंतर पंत बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. त्याने आयपीएलचा एक संपूर्ण हंगामही गमावला.

पंत सध्या ऑस्ट्रेलियात असून, त्याच्या या उदार कृतीचा व्हिडिओ सेव्हन प्लस या ऑस्ट्रेलियन वाहिनीने शेअर केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पंतच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.



दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पर्थ येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 150 धावांत गारद झाला. मात्र, दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी 172 धावांची अप्रतिम भागीदारी करत भारताला भक्कम स्थितीत नेले आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारताने 218 धावांची आघाडी घेतली आहे.

Leave a Comment