पाटणा येथे ‘पुष्पा 2: द रुल’ ट्रेलर लॉन्चला चाहत्यांचा प्रचंड उत्साह, गर्दी नियंत्रणाबाहेर

पाटण्याच्या गांधी मैदानावर रविवारी ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा भव्य उत्साहात पार पडला. अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या संवादाचा अनुभव घेण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. चाहत्यांचा जोश इतका वाढला की पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यात आले, काही जण वॉच टॉवरवरही चढले. परिणामी, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पाटण्याचे जिल्हाधिकारी (डीएम) आणि पोलीस अधीक्षक (एसएसपी) घटनास्थळी हजर होते, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल याचा अंदाज प्रशासनाला नव्हता. संध्याकाळी 6.30 वाजता ठरलेल्या या कार्यक्रमाला गर्दीच्या ओघामुळे साडेपाचलाच सुरुवात करण्यात आली.



कार्यक्रमादरम्यान अल्लू अर्जुनने उपस्थित चाहत्यांना अभिवादन करत बिहारच्या पवित्र भूमीचा सन्मान केला. तो म्हणाला, “मी पहिल्यांदाच बिहारमध्ये आलोय आणि येथे मिळालेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. चित्रपटातील ‘पुष्पा झुकेगा नहीं’ हा डायलॉग प्रसिद्ध असला, तरी तुमच्या प्रेमासमोर आम्हाला नतमस्तक व्हावे लागले.”

Leave a Comment