सिनेसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. यंदा काही सिनेमांनी त्यांच्या कथानक, अभिनय आणि दिग्दर्शनामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. येथे असे 10 सिनेमे आहेत, जे तुम्ही नक्कीच पाहायला हवेत.
1. आय वॉन्ट टू टॉक
सुजित सरकार दिग्दर्शित आणि अभिषेक बच्चनच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा चित्रपट कॅन्सरग्रस्त वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. हा अभिषेकच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सिनेमा मानला जातो.
2. चंदू चॅम्पियन
कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट अपंगत्वावर मात करून चॅम्पियन बनलेल्या मुरलीची प्रेरणादायी कहाणी सांगतो. कार्तिक आर्यनने घेतलेली मेहनत प्रेक्षकांना जाणवते.
3. मडगाव एक्सप्रेस
कुणाल खेमू दिग्दर्शित हा गोव्यातील तीन मित्रांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. प्रतीक गांधी, दिव्येंदु, आणि उपेंद्र लिमये यांच्या अभिनयाने भरलेला हा चित्रपट मनोरंजनासह विचार करायला लावतो.
4. खेल खेल में
अक्षय कुमारने साकारलेला सनी हा मजेशीर कॅरेक्टर प्रेक्षकांचं मन जिंकतो. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेला हा वर्षातील सर्वोत्तम कॉमेडी सिनेमा आहे.
5. ऑल इंडिया रँक
शिक्षण व्यवस्थेवरील भाष्य करणारा वरुण ग्रोव्हरचा हा चित्रपट 17 वर्षीय विवेकच्या आयुष्याची गोष्ट सांगतो. हा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी सिनेमा पाहण्याजोगा आहे.
6. मैदान
अजय देवगणचा हा ऐतिहासिक चित्रपट भारतात फुटबॉलला ओळख देणाऱ्या सईद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रातील प्रेरणादायी कथा या चित्रपटातून उलगडते.
7. दो और दो प्यार
प्रतीक गांधी, विद्या बालन, आणि इलियाना डिक्रुझ यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आधुनिक नातेसंबंधांवर भाष्य करतो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि तुटणाऱ्या नात्यांची गुंतागुंत या चित्रपटात मांडली आहे.
8. जिगरा
आलिया भट्टने साकारलेला हा सिनेमा भावासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या बहिणीची गोष्ट सांगतो. भावनिक वळण आणि दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट नक्की पहावा.
9. मेरी ख्रिसमस
कतरीना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सस्पेन्स-थ्रिलर सिनेमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. उत्कृष्ट कथानक आणि अभिनयामुळे हा चित्रपट विशेष आहे.
10. किल
लक्ष्य आणि राघव जुयालच्या मुख्य भूमिका असलेला हा एक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. राघवच्या फॅनी कॅरेक्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, तर लक्ष्यचा अभिनय पहिल्याच सिनेमात भाव खाऊन गेला.
या सर्व चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. तुम्हीही यापैकी कोणता चित्रपट पाहिला आहे का? तुमचे अनुभव आम्हाला जरूर सांगा.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!