महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH SET Exam 2025) चा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) सेट परीक्षा विभागामार्फत दिनांक १५ जून २०२५ रोजी ही परीक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यातील १८ शहरांमधील विविध महाविद्यालयांत पार पडली होती. या परीक्षेत १ लाखांहून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता.
ही ४० वी राज्य पात्रता परीक्षा (SET) असून आज, ३० ऑगस्ट २०२५ रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांना आपला निकाल पाहण्यासाठी सेट विभागाची अधिकृत वेबसाईट https://setexam.unipune.ac.in/Result.aspx येथे भेट देता येईल.
MH SET 2025 निकाल कसा पाहावा?
निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात :
- सर्वप्रथम SET Exam Official Website ला भेट द्या
- परीक्षेचे वर्ष व तारीख निवडा
- आपला परीक्षा क्रमांक, नाव, जन्म तारीख आणि मोबाईल क्रमांक नोंदवा
- ‘सबमिट’ केल्यानंतर निकाल स्क्रीनवर उपलब्ध होईल
32 विषयांमध्ये परीक्षा आयोजित
या वर्षीची परीक्षा एकूण ३२ विषयांमध्ये घेण्यात आली. याआधीच्या ३९ सेट परीक्षा प्रामुख्याने ऑफलाईन पद्धतीने झाल्या होत्या. मात्र, यूजीसीच्या नवीन आदेशानुसार २०२५ नंतर होणाऱ्या पुढील MH SET परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
पुढील पायरी
MH SET ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता प्राप्त होते. यामुळे हजारो उमेदवारांसाठी शैक्षणिक क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महत्वाची लिंक
👉 MH SET Result 2025 – येथे पाहा निकाल