महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयात जाहीर करण्यात आला. या सोडतीत यवतमाळ येथील न्यू जय अंबे लॉटरी भंडारामधील खरेदीदाराला एक कोटी रुपयांचे पहिले (सामायिक) बक्षीस लागले असल्याची माहिती उपसंचालकांनी दिली आहे.
सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ. श्री. एन. रामास्वामी उपस्थित होते. सोडतीत प्रोत्साहनपर बक्षिसे आणि विविध रकमेची एकूण १०,४२८ बक्षिसे जाहीर करण्यात आली. यामध्ये चार खरेदीदारांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षिस, पाच खरेदीदारांना पाच लाख रुपयांचे दुसरे बक्षिस, आणि पाच खरेदीदारांना एक लाख रुपयांचे तिसरे बक्षिस लाभले आहे. याशिवाय रु. १०,०००/- पेक्षा कमी रकमेची विविध बक्षिसेही सोडण्यात आली असून एकूण बक्षिसांची रक्कम २ कोटी २० लाख ५० हजार इतकी आहे.
बक्षीस रक्कम कशी मागणी कराल?
रुपये १०,०००/- च्या वरच्या बक्षिसासाठी खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर दिलेली प्रक्रिया पूर्ण करून उपसंचालक (वित्त व लेखा) कार्यालयात मागणी सादर करावी. रुपये १०,०००/- च्या आतील बक्षिसांची रक्कम संबंधित विक्रेत्याकडून घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
लॉटरीतील विजेत्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून लवकरात लवकर बक्षिसाची मागणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रशासनाने केले आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!