महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे – पवार यांनी कळविले आहे.
बारावी परीक्षांचे वेळापत्रक:
लेखी परीक्षा: ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५
दहावी परीक्षांचे वेळापत्रक:
लेखी परीक्षा: २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक त्यांच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून मिळालेल्या छापील स्वरूपावरूनच तपासून घ्यावे. ऑनलाइन वेळापत्रक फक्त माहितीसाठी असून, अन्य संकेतस्थळे किंवा माध्यमांवरील वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला www.mahahsscboard.in भेट देऊ शकतात.
- Casio G-Shock: स्टाईल आणि टिकाव यांचा जबरदस्त संगम
- HSRP नंबर प्लेट कसे बनवाल तेही आपल्या मोबाईलवरून
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 2024 पिक विमा भरपाईसाठी 1028 कोटींचा निधी वितरीत
- IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ फेल? पहिल्या दिवशी टीम इंडिया मानसिक लढाईत सरस!
- लॉर्ड्स कसोटी : नितीश कुमार रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, पहिल्याच षटकात दोन विकेट्स