महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) 2025 निकाल या दिवशी जाहीर होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 40व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (SET Exam 2025) निकाल 30 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र तसेच गोवा शासन प्राधिकृत ही परीक्षा विद्यापीठे व वरीष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य पात्रता मानली जाते.

सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाचा नोडल एजन्सी विभाग असून, तो UGC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही परीक्षा आयोजित करतो. यंदा 40 वी SET परीक्षा 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यातील 18 शहरांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर यशस्वीपणे पार पडली.

सेट विभागाने कळवले आहे की, सर्व परीक्षार्थींनी आपला निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://setexam.unipune.ac.in येथे भेट द्यावी. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला लॉगिन आयडी व पासवर्ड वापरावा लागणार आहे.

SET 2025 परीक्षेचे ठळक मुद्दे

  • परीक्षा दिनांक: 15 जून 2025
  • परीक्षा केंद्रे: 18 शहरांतील विविध महाविद्यालये
  • निकाल जाहीर होण्याची तारीख: 30 ऑगस्ट 2025
  • अधिकृत संकेतस्थळ: https://setexam.unipune.ac.in

या परीक्षेतील पात्र उमेदवारांना महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे आणि वरीष्ठ महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्याची पात्रता प्राप्त होणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या निकालाची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे.

विद्यार्थ्यांनी निकालाबाबतच्या अधिक माहितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment