जिओ नेटवर्क डाउन: अनेक भागांमध्ये युजर्स त्रस्त, 24 तासांतही सेवा सुरळीत नाही

देशाच्या अनेक भागांमध्ये जिओ नेटवर्क डाउन झाल्याने युजर्सनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला आहे. फोन कॉल्स न होणे, इंटरनेट स्पीड अत्यंत कमी होणे आणि काही वेबसाइट्स उघडण्यात अडचणी येणे यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.



टेलिकॉम सेक्टरमधील मोठ्या ब्रँडपैकी एक असलेल्या जिओने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. काही युजर्सनी 24 तास उलटूनही सेवा सुधारली नसल्याची तक्रार केली आहे. यामुळे अनेकांना वैयक्तिक तसेच व्यावसायिक कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे.



जिओ ग्राहकांनी ही समस्या अनुभवत असल्यास त्यांनी खाली कमेंट करून त्यांचे अनुभव नोंदवावेत.

Leave a Comment