भारतीय रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या अतिरिक्त शुल्काबाबत अनेक प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. १३ नोव्हेंबर रोजी एक अशीच घटना घडली, ज्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई केली. ट्रेन क्रमांक १२४१४ पूजा सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने पाण्याच्या बाटलीवर अतिरिक्त शुल्क आकारले जाण्याबाबत तक्रार केली. ही तक्रार १३९ हेल्पलाईनवर नोंदवली गेली, आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने संबंधित केटरिंग कंपनीवर कारवाई केली.
घटना अशी घडली की, थर्ड एसी कोचमधील कॅटरिंग स्टाफने एक पाण्याची बाटली २० रुपयांना विकली, जी १५ रुपयांना मिळायला हवी होती. प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता, कर्मचारी उत्तर दिले की ‘आम्हालाही पाच रुपये हवे आहेत’. यावर प्रवाशाने फोनवर रेकॉर्डिंग केली आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई केली आणि केटरिंग कंपनीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
हेही वाचा:
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली, ज्यामुळे ही बातमी वेगाने व्हायरल झाली. युजर्सनी या प्रकारावर आपले मत व्यक्त केले असून, अनेकांनी भारतभर रेल्वेच्या कॅटरिंग सेवा आणि अतिरिक्त शुल्कांबाबत तक्रारी केल्या. काही प्रवाशांनी ट्रेनमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबतही तक्रारी केल्या आहेत.
139 पर आई ओवरचार्जिंग की शिकायत, रेलवे ने लिया फटाफट एक्शन, कैटरिंग कंपनी पर लगा एक लाख का जुर्माना।
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 23, 2024
यात्रियों को ओवर चार्जिंग की राशि की गई रिटर्न! pic.twitter.com/8ZaomlEWml
या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाचे कठोर पावले उचलताना दिसून आले असून, प्रवाशांच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे दिसते.
- WCL 2025: भारत चॅम्पियन्स संघाचा पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार – देशहिताला प्राधान्य
- भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याचा ऐतिहासिक टप्पा: ‘NISAR’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
- जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना फडणवीसांचा स्पष्ट नकार
- ट्रम्प यांचा भारतावर नवा आर्थिक हल्ला: 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लागू
- ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’साठी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत तज्ज्ञांची मते; महत्त्वपूर्ण शिफारसी सादर