डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू – अर्जासाठी अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2025


मुंबई: डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी पीएच.डी. अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, विविध शास्त्रशाखांमध्ये संशोधन करण्याची संधी मिळणार आहे.

ही प्रवेश प्रक्रिया विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवीविज्ञान आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास या विभागांमध्ये सुरु करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.hbsu.ac.in वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची महत्त्वाची माहिती:

  • ऑनलाईन अर्जाची सुरुवात: 01 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 ऑगस्ट 2025
  • संकेतस्थळ: www.hbsu.ac.in

विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक माहिती आणि अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक वाचून पुढे जावे. विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्वे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत.

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी ही संशोधनाच्या क्षेत्रात एक अग्रगण्य संस्था असून, येथे दर्जेदार शिक्षण आणि संशोधनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष या प्रवेश प्रक्रेकडे लागले आहे.

अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावर किंवा कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन कुलसचिव प्रा. विलास पाथ्रे यांनी केले आहे.

Leave a Comment