दिलजीत दोसांझ ठरले 2024 च्या टॉप 50 आशियाई व्यक्तिमत्त्वांच्या यादीत अव्वल!

प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी ‘ईस्टर्न आय’ या ब्रिटिश साप्ताहिक वृत्तपत्राने जाहीर केलेल्या ‘2024 च्या जागतिक टॉप 50 आशियाई व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. सिनेमा, संगीत, कला आणि साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतिभांना मागे टाकत दोसांझ या यादीत अव्वल ठरले आहेत.

दिलजीत दोसांझ: संगीत आणि अभिनयाचा अनोखा संगम


दोसांझ यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सवांतून आपली लोकप्रियता वाढवली आहे. त्यांच्या अलीकडील ‘दिल-लुमिनाटी’ वर्ल्ड टूरने इतिहास घडवला असून, हा जगातील सर्वाधिक यशस्वी दक्षिण आशियाई टूर ठरला आहे.
याशिवाय, ‘द टुनाइट शो स्टारिंग जिमी फॉलन’मधील त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीने भारतीय संगीताला नवी ओळख मिळवून दिली आहे.

टॉप 50 यादीतील इतर मान्यवर

हेही वाचा –


या यादीत भारतीय वंशाच्या पॉप गायिका चार्ली एक्ससीएक्स दुसऱ्या स्थानावर आहेत, तर तिसऱ्या स्थानावर अभिनेता अल्लू अर्जुन आहेत, ज्यांच्या ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम प्रस्थापित केला. अभिनेता आणि दिग्दर्शक देव पटेल चौथ्या स्थानावर असून त्यांनी ‘मंकी मॅन’ चित्रपटाद्वारे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनयात आपली क्षमता सिद्ध केली आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास पाचव्या स्थानावर, तर तमिळ सुपरस्टार विजय सहाव्या स्थानावर आहेत. गायक अभिजीत सिंह सातव्या स्थानावर असून पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आणि ब्रिटिश अभिनेत्री सिमोन एश्ले टॉप 10 मध्ये आहेत.

बिग बी आणि नवोदितांचा समावेश


या यादीत समाविष्ट सर्वात ज्येष्ठ कलाकार म्हणजे 82 वर्षीय अमिताभ बच्चन (26वे स्थान), तर सर्वात युवा कलाकार 17 वर्षीय नितांशी गोयल (42वे स्थान) आहेत. नितांशी यांना ‘लापता लेडीज’ या भारताच्या अधिकृत ऑस्कर नामांकनात उत्कृष्ट अभिनयासाठी हा मान मिळाला आहे.

दिलजीत दोसांझसाठी स्वप्नवत वर्ष


‘ईस्टर्न आय’चे मनोरंजन संपादक असजाद नजीर म्हणाले, “गायन, अभिनय आणि पंजाबी संस्कृतीच्या अभिमानासोबत दिलजीत दोसांझ यांनी 2024 हे वर्ष आपल्या नावावर केले आहे.”

Leave a Comment