शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या २३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार, डीएड आणि बीएड अर्हता धारक बेरोजगार उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
भरतीची ठळक वैशिष्ट्ये
नियुक्ती स्थळ: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा
मानधन: रु. १५,०००/- प्रती महिना
अर्जाची अंतिम तारीख: १० डिसेंबर २०२४
अर्ज करण्याचे ठिकाण: प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली
अटी व शर्ती
1. ही नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून शासनाच्या कोणत्याही संवर्गात समावेशनाचा अधिकार मिळणार नाही.
2. उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी १८ ते ४३ वर्षे असावे.
3. डीएड किंवा बीएड ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य आहे.
4. स्थानिक रहिवाशांना प्राधान्य दिले जाईल – शाळेच्या गावातील रहिवासी, तालुका रहिवासी, जिल्हा रहिवासी या क्रमाने प्राधान्य.
5. नियुक्ती कालावधी एका शैक्षणिक वर्षाचा असेल. आवश्यकता भासल्यास याचा कालावधी वाढवण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचा राहील.
6. करारनामा व मान्यतापत्राद्वारे उमेदवारांनी सर्व अटी व शर्ती मान्य करणे आवश्यक आहे.
7. नियुक्त कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यावर संपुष्टात येईल.
टीप
या योजनेसाठी यापूर्वी अर्ज सादर केला असल्यास, तोच अर्ज ग्राह्य धरला जाईल. नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
प्रक्रिया आणि संपर्क
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यात अर्ज करून विहीत मुदतीत तो सादर करावा.
अधिक माहितीसाठी:
ईमेल: eoprisang@gmail.com
दूरध्वनी: ०२३३-२३७२७१७
- Dashavatar Box Office: ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘वेड’चा रेकॉर्ड मोडणार का दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट?
- चंदन आणि बेसनचा फेस मास्क: टॅनिंग घालवून चेहऱ्याला देईल नैसर्गिक ग्लो
- ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा
- पुरण न वाटता बनवा टम्म, गुबगुबीत आणि मऊसर पुरणपोळी – नवशिक्यांसाठी सोप्या टिप्स
- चहाला साखरेऐवजी घाला हे 5 नैसर्गिक पदार्थ, चहा बनेल हेल्दी व नैसर्गिक गोड