कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेमुळे सतेज पाटील यांच्या काँग्रेसच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, ज्यामुळे विरोधकांनी काँग्रेसवर टीका सुरू केली आहे.
काँग्रेसच्या माघारीचा परिणाम
मधुरीमाराजे छत्रपती यांच्या माघारीमुळे सतेज पाटील यांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला. मधुरीमाराजे छत्रपती यांच्या माघारीमुळे कोल्हापूर उत्तरमधील मविआचा उमेदवारच रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाले, आणि विरोधकांनी “काँग्रेस गायब” असा शब्दप्रयोग केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात काँग्रेसवर टीका केली.
सतेज पाटील यांना खचलेल्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. कार्यकर्त्यांचे अपार प्रेम पाहून पाटील यांचे अश्रू अनावर झाले. सोमवारी दुपारपासून कोल्हापूर उत्तर चर्चेचे केंद्र बनले होते, आणि सतेज पाटील यांचे आक्रमक रूप व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल.
आयुष्मान वय वंदना कार्ड: घरी बसून पाच लाखांचा मोफत विमा कसा मिळवावा?
कार्यकर्त्यांचे समर्थन
सोमवारी सायंकाळी, सतेज पाटील यांचे मनोबल वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीला जाऊन “तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. यावेळी पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले, “जे काही झाले ते तुमच्या समोर आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हा लोकांची साथ गरजेची आहे,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
संतापाचा कडेलोट
मधुरीमाराजे छत्रपती यांच्या माघारीमुळे सतेज पाटील यांचा संताप उफाळून आला. “झक मारायला मला तोंडघशी पाडलं का?” असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेत्यांशी बोलून त्यांनी लाटकर यांच्याऐवजी छत्रपती घराण्यात उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता. परंतु त्यांनीच अंतिम क्षणी माघार घेतल्याने पाटील यांचा राग चढला.
“कशाला झक मारायला मला तोंडघशी पाडले? दम नव्हता तर उमेदवारी घ्यायची नव्हती ना… मी पण माझी ताकद दाखवली असती,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. रागातच पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर निघून गेले.