छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्यदिव्य सिनेमा; ऋषभ शेट्टी साकारणार शिवरायांची भूमिका

बॉलिवूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्यदिव्य सिनेमा येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ असं ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘कांतारा’ फेम दक्षिणेचा सुपरस्टार ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप सिंग करणार आहेत. संदीप सिंग यांना यापूर्वी ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’ यांसारख्या आशयघन आणि प्रभावी चित्रपटांची निर्मिती केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शिवरायांच्या भूमिकेत ऋषभ शेट्टीची झलक पाहायला मिळत असून त्याची तीव्र आणि रॉयल मुद्रा प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिक भर घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेला प्रेक्षक मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आतुर असतील, हे निश्चित.

हा चित्रपट भारतीय इतिहासाच्या महत्त्वाच्या पानाला उजाळा देणार असून, प्रेक्षकांसाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी अनुभव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment