आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) मार्फत चालविल्या जाणाऱ्या देशभरातील १४० आर्मी पब्लिक स्कूल्स (APS) मध्ये शिक्षक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (OST) २०, २१, २२ व २३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना संबंधित शाळांच्या इंटरव्ह्यू आणि अध्यापन कौशल्य मूल्यमापन टप्प्यासाठी बोलावले जाईल. पदांची संख्या आणि शाळानिहाय तपशील नंतर प्रसिद्ध होणार आहेत.
महाराष्ट्रातील आर्मी पब्लिक स्कूल्स
क्लस्टर-१:
- APS पुणे
- APS खडकी
- APS दिघी
- APS देहू रोड
- APS खडकवासला
क्लस्टर-२:
6. APS देवळाली
7. APS मुंबई
8. APS अहमदनगर
9. APS काम्टी (नागपूर)
10. APS MIC & S, अहमदनगर
उपलब्ध पदे व पात्रता
- पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT): संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी व बी.एड. (किमान ५०% गुणांसह)
- ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर (TGT): संबंधित विषयात पदवी व बी.एड. (किमान ५०% गुणांसह)
- प्रायमरी टीचर (PRT): पदवी व बी.एड. किंवा इलेमेंटरी एज्युकेशनमध्ये २ वर्षांचा डिप्लोमा (किमान ५०% गुणांसह)
टीप: पदवीला ५०% पेक्षा कमी गुण असलेले पण पदव्युत्तर पदवीत ५०% किंवा अधिक गुण असलेले उमेदवार TGT आणि PRT साठी पात्र. सर्व पात्रता नॅशनल काऊन्सिल ऑफ टिचर्स एज्युकेशन मान्यताप्राप्त संस्थेमधून असावी.
वयोमर्यादा
- अनुभव नसलेले: १ एप्रिल २०२५ रोजी ४० वर्षांपर्यंत
- अनुभवी (५ वर्षांपेक्षा जास्त, गेल्या १० वर्षांत): ४० ते ५५ वर्षे
निवड प्रक्रिया
- स्टेज-१: ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (२०० बहुपर्यायी प्रश्न)
- स्टेज-२: इंटरव्ह्यू
- स्टेज-३: अध्यापन कौशल्य मूल्यमापन
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२५ (सायं. ५ वाजेपर्यंत)
- ऑनलाइन मॉक टेस्ट उपलब्ध: १ सप्टेंबर २०२५ पासून
- परीक्षेच्या तारखा: २०, २१, २२ व २३ सप्टेंबर २०२५
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी www.awesindia.com या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी.