आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत केसगळतीची समस्या जवळपास प्रत्येकालाच भेडसावत आहे. प्रदूषण, तणाव, अयोग्य आहार आणि रासायनिक उत्पादनांचा अतिरेक यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात. यावर महागडी बाजारातील उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं नैसर्गिक तेल अधिक फायदेशीर ठरू शकतं. विशेष म्हणजे हे तेल तुम्ही केवळ 10 रुपयांच्या वस्तूंनी तयार करू शकता.
नारळ तेलाचे महत्त्व
नारळ तेल हे केसांसाठी सर्वोत्तम मानलं जातं. यात असलेले नैसर्गिक फॅटी ऍसिड्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केसांची मुळे मजबूत करतात, कोंडा कमी करतात आणि केसांना नैसर्गिक चमक देतात.
लागणारे घटक
- नारळ तेल
- कांदा (बारीक चिरलेला)
- कढीपत्ता
- मेथीदाणे
- आलं
- कलौंजीचे दाणे
- ताजं आलोव्हेरा
बनवण्याची पद्धत
- एका मोठ्या भांड्यात नारळ तेल हलकं गरम करावं.
- त्यात कांदा, आलं, कढीपत्ता, मेथीदाणे, कलौंजी आणि एलोव्हेरा घालावं.
- हे मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावं.
- घटक जळल्यावर तेल काळसर रंगाचं होतं.
- ते गाळून काचेच्या डब्यात साठवा.
हे तेल काही महिन्यांपर्यंत टिकतं आणि त्याची परिणामकारकता कमी होत नाही.
वापरण्याची योग्य पद्धत
- केस धुण्याआधी 1-2 तास हे तेल मुळांपासून टोकांपर्यंत लावून हलक्या हाताने मसाज करा.
- मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि पोषण थेट केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतं.
- रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावून ठेवले तर आणखी चांगला परिणाम दिसतो.
इतर उपयुक्त सवयी
केवळ तेल वापरणं पुरेसं नसून संतुलित आहार, पुरेसं पाणी, तणावाचं व्यवस्थापन आणि झोप यांचाही केसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.
👉 नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं हे अँटी हेअर फॉल तेल वापरल्यास केस गळतीवर नियंत्रण मिळवता येतं आणि केस पुन्हा लांब, दाट व सुंदर दिसतात.
टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणत्याही गंभीर समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.