शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील आशिया खंडातील सर्वात मोठा अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा आज सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. 1 डिसेंबर 1974 रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले होते, आणि आज त्याला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.
भव्य शिल्पकलेचा नमुना
तत्कालीन प्रख्यात शिल्पकार स्व. बी. आर. खेडकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली. 36 फूट 6 इंच उंचीच्या या ब्राँझ पुतळ्याचे वजन तब्बल 8 टन आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेल्या या पुतळ्याला चबुतऱ्यासह शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात प्रतिष्ठित स्थान आहे.
लोकसहभागातून उभा राहिलेला प्रकल्प
हा पुतळा लोकवर्गणीच्या माध्यमातून उभा करण्यात आला. भोगावती, दूधगंगा-वेदगंगा, वारणा, कुंभी-कासारी, आणि पंचगंगा या सहकारी साखर कारखान्यांनी प्रत्येकी 60 हजार रुपयांचे योगदान दिले. शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक यांच्या मदतीने एकूण 3 लाख 66 हजार रुपये जमा झाले.
शिवाजी विद्यापीठाचा मानबिंदू
हा भव्य पुतळा केवळ शिवाजी विद्यापीठाचा नव्हे, तर कोल्हापूरचा मानबिंदू बनला आहे. त्याच्या भव्यतेमुळे तो परिसरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची आठवण करून देतो.
सुवर्ण महोत्सव साजरा करताना…
या सुवर्ण महोत्सवानिमित्त कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मानाचा मुजरा करण्यात आला.
#जय_जिजाऊ #जय_शिवराय #शिवाजी_विद्यापीठ
- एमपीएससी मुख्य परीक्षा : माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा अभ्यास कसा करावा?
- उद्योगांच्या सर्व परवान्यांसाठी आता ‘मैत्री पोर्टल’ एकच प्रवेशद्वार: मुख्यमंत्री फडणवीस
- महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण घराला मिळणार प्रॉपर्टी कार्ड; ड्रोनद्वारे सर्वेक्षण, दोन वर्षांत काम पूर्ण
- ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तीन हजार कोटींचा निधी वितरित
- वैद्यकीय महाविद्यालयांतील EWS आरक्षण रद्द