माझी_लाडकी_बहीण: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड मताधिक्याने विजयी बनवण्यात या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली. आता निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पुढील हप्ता कधी जमा होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
योजनेचा आढावा
जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात नियमित हप्ते जमा होत आहेत. आतापर्यंत महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांचे एकूण ₹7500 जमा करण्यात आले आहेत. यामध्ये जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे रक्षाबंधनाच्या आधी जमा झाले, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे आचारसंहितेपूर्वी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकत्र जमा करण्यात आले.
हप्ता वाढणार का?
महायुतीने निवडणुकीदरम्यान महिलांना आश्वासन दिले होते की, सरकार सत्तेत आल्यावर या योजनेचा हप्ता ₹1500 वरून ₹2100 करण्यात येईल. सध्या महिलांमध्ये यासंदर्भात चर्चा रंगली आहे. महिलांना आशा आहे की सरकारने दिलेले वचन पूर्ण होईल आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाढीव रक्कमेसह त्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
जुन्नर तालुक्यातील महिला आनंदात
हेही वाचा –
या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये जुन्नर तालुक्यातील शेकडो महिला आहेत. अनेक महिलांच्या खात्यात हप्ते वेळेवर जमा झाल्याने त्या समाधानी आहेत. मात्र, हप्त्याच्या रकमेतील वाढ होणार की नाही, याबाबतची स्पष्टता लवकरच होण्याची अपेक्षा आहे.
महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा स्त्रोत ठरली आहे. आता या योजनेचा हप्ता वाढीव रक्कमेसह जमा झाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सद्यस्थितीत हप्ता जमा होण्याची तारीख आणि वाढीव रक्कम याबाबतची अधिकृत माहिती येणे बाकी आहे.
- किरण देसाई पुन्हा बुकरच्या शर्यतीत; ‘द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी’ कादंबरीला मान्यता
- ७ ऑगस्टपासून ‘शाश्वत शेती दिन’; डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना आदरांजली
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : उत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठी २९० कोटींचे बक्षीस वाटप
- आधार पीव्हीसी कार्ड कसे मागवायचे? | myAadhaar पोर्टलवरून घरबसल्या ऑर्डर करा
- राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना : बनावट शाळा आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा पर्दाफाश